सहजा-सहजी एखादी गोष्ट मिळणे आणि तीच गोष्ट ठेचकाळत, धडपडत ‘मिळवणे’ ह्यात खूप मोठं अंतर असतं. थोडक्यात म्हणायचं तर त्या गोष्टीची खरी किंमत म्हणा किवा महत्त्व म्हणा, धडपडल्याशिवाय कळत नाही. खूप कमी लोक असतात ज्यांना सहज सगळं उपलब्ध होऊनही ह्या सत्याची जाणीव असते.
एवढा क्लिष्ट विचार करण्याचं कारण? fresher मंडळी join झालीये ४-६ महीन्यापूर्वी, सगळेच जवळपास campus selection मधून आलेत. त्यातली एक आमच्या team मध्ये ‘assign’ झाली. वातावरणाशी जुळू देत म्हणून सुरुवातीला थोडं दमाने घेतलं. नाही म्हटलं तरी college life चा feel जायला थोडा काळ लागतोच. तर हळू हळू जरा लहान-सहान assignments दिली, वेळेचं वगैरे बंधन नाही, त्यातून त्यानी काहीतरी शिकावं आणि तयार होत जावं एवढाच प्लान. अन ह्या सगळ्यात जे काही अनुभवायला मिळतंय ते निव्वळ अनपेक्षित आहे. अमुक-तमुक technology मध्ये मला काम करायचं नाहीये, त्यात मला interest नाहीये अशी सुरुवात झाली. अजून लहान आहेत म्हणून जरा वेळ काढून समजावून बघितलं, सुरुवातीला कसं सगळं कठीण वाटतं, एकदा जमलं की मग कसं interesting वाटेल इति. इति. पण नाही म्हणजे नाही..पुढचा response होता:”मला नाही वाटत की माझा ह्यात interest develop होईल म्हणून!” आता मात्र खरच चाट पडले मी.
हो, म्हणजे आयुष्यात तुम्हाला काय करायचं आहे किंवा काय करायचे नाहीये ह्याची clarity नक्कीच असावी, पण एवढी? म्हणजे अजिबात प्रयत्न करायचा नाही अन आधीच शस्त्र टाकायचे? इच्छा नाही की करायचा कंटाळा? सहज job मिळणे एवढे कठीण नको ते बळ देते? अन मग खरच वाईट वाटतं, बाहेर कितीतरी ख-या अर्थाने ‘लायक’ पोरं-पोरी रोज खस्ता खातायेत, रोज सकाळी उठलं की नव्या दमाने लागायचं, माहीत नसलेल्या शहराला आपलं बनवत सगळे रस्ते पिंजून काढायचे..तास-अन-तास वाट बघत interview च्या process मधून जायचं, rejection पचवायचं अन त्यातूनच धडा घ्यायचा..पुन्हा स्वत:च स्वत:ला सावरायचं, घरच्यांना धीर द्यायचा अन त्यांच्याकडून घ्यायचाही, सोपं काहीच नसतं त्या काळात..रोज पडायचं अन मग उठून पुन्हा चालायला लागायचं..ही सगळी धडपडच तर शिकवून जाते खूप काही..
नकळत आयुष्यभराचा धडा देऊन जातात हे अनुभव..अन तेच तुम्हाला जमिनीवर ठेवतात, भरकटू देत नाहीत. संघर्षासाठी बळ लागतं तसं संघर्षातून बळ मिळतंही.
त्यामुळेच अश्याप्रकारच्या दिव्यातून प्रत्येकाने एकदा तरी जायला हवं. स्वत:च स्वत: ला घडवण्याचा तो एक भाग ठरतो..अन ह्यात स्वयंप्रेरणेचा जो काही कायमचा ठेवा गवसतो त्याचं महत्त्व वेगळंच. अशी प्रेरणा तुम्हालाही ‘चालतं’ ठेवते अन इतरांनाही नकळत मार्गदर्शक ठरू शकते.
थोडक्यात काय तर ‘मूळं’ पक्की होत जातात, कुठल्याही वादळात टिकून राहण्यासाठी..
निदा फाज़लींच्या ‘सफ़र में धूप तो होगी’ मधल्या ह्या ओळी म्हणूनच खूप काही सांगून जातात
“हर इक सफ़र को है महफूस रास्तो की तलाश
हिफाज़तो की रिवायत बदल सको तो चलो..”
pankaj borole
नोव्हेंबर 29, 2011 at 11:30 pm
Completely agree with you! Really some people do not care whatever they get easily.
Based on our experiences we try to educate them.
On the top of this, I observed that LIFE has its OWN way to teach these kind of people at different stages. and sometimes these are HARD ways – and the one who has never seen (or skipped) DHUP in his life, He will feel it even in Monsoon.
विजय
डिसेंबर 2, 2011 at 11:33 सकाळी
Welcome back!
नवीन मुलांना शिकवण्याचा नाद मी खूप पूर्वीच सोडून दिला, जेव्हा मलाच एकजण शिकवत बसला होता
तुझ्या उदाहरणातल्या पात्रामध्ये clarity आहे की नाही हे माहित नाही. पण एक reality ही देखील असेल: Many fresher prepare themselves for various entrance exam. While they do so, they continue to work for a company and earn some money too. I have seen many such examples. So those people do not “Want” to develop interest. They already have their hands full for exam preparations. And believe me, at some point it feels ridiculously foolish for spending time trying to nurturing those who have already chosen their soil to be somewhere else.