कॉलेज ला असतानाचा प्रसंग आठवला सकाळी..Engineeringचे शेवटचे वर्ष होते, झालं काय की होळी वगैरे खेळण्याची hostel मध्ये permission नव्हती..त्यामुळे प्रश्न नव्हताच.. तरी होत्या काही वल्ली मैत्रिणी, ज्यांनी ‘शेवटच’ वर्ष ह्या tag खाली अचानक आम्हाला surprise दिले..झाले, warden २-३ रूम सोडून राहायला होती..ओळीने उभं केलं सगळ्यांना..झाल्या प्रकारची आम्ही सगळ्यानी माफी मागून घेतली अगदी मनापासून ..४ वर्षात आमची एकही तक्रार गेलेली नव्हती म्हणून आम्हालासुद्धा जरा guilty वाटतच होतं, त्यामुळे म्हणलेलं sorry सुद्धा अगदी आतून आलेलं होतं..पण तिचं मन नाही भरलं तेवढ्याने..बोलली ‘शिंग फुटली काय ४ वर्षात!’ मग मात्र माझ्यातली सुप्त झाशी झाली जागी, झाप झाप झापलं मीच तिला (नीट शब्दात)..एवढंच पटवून दिलं की झाल्या प्रकाराची जर आम्ही कबुली देऊन मनापासून माफी मागतोय तर तुम्ही योग्य शब्दात काय ते झापा ना, तुमच्या बरोबरीने आम्ही उद्या बाहेरच्या जगात पाउल ठेवणार आहोत तेव्हा शिंग वगैरे बोचरं वाटतं..group मधल्या बाकी सगळ्या चकीत, माझं हे रूप त्यांनाही नवीन, त्यामुळे जे झाले त्यापेक्षा जे होतंय त्यावर त्यांचा विश्वास बसत नव्हता..
पण होतं ते खरं..शेंगा खाल्ल्याचं आम्ही मान्य केलं, टरफलेही उचलतो म्हणालो मनापसुन..
हे सगळं आठवण्याचं कारण…सकाळी सकाळी office मध्ये एकाने वस्तुस्थिती जाणून न घेता तोफा डागायला सुरुवात केली, सुरुवातीला उगाच का blame game वाढवा म्हणून मी शांततेने घेतलं..वाटलं कपातलं वादळ ठेवा कपात. पण अजूनच चेव चढला समोरच्याला..मग झाली ना माझ्यातली झाशी जागी..मी शेंगा कश्या खाल्ल्या नाही हे मोजक्या शब्दात दिलं पटवून…मग झालं शांत वादळ (आता शांत झालंय की ही वादळापूर्वीची शांतता आहे हे कळेलच मागे पुढे
)..असो..
पण हे खूप common आहे..घर असो की office, नसते वाद चिघळवून मुख्य गोष्टीवरचा focus घालवला जातो..समोरच्याला मनापासून चूक मान्य असेल तर काय गरज आहे वाद वाढवायची..माफी मागून अन पुन्हा असं होणार नाही अश्या शब्दात माफ करून प्रश्न सुटत असतील तर मग बोचरे शब्द वापरून उगाच वादाचं chewing-gum का करायचं, कपभर पाण्याने विझणारी आग बंब भर पाणी लागण्याइतकी का उगाच भडकावायची?? तसंच समोरच्याचं खरच चुकलंय का ह्याची पण आधी खात्री घ्यावी करून, उगाच चालत्या गाडीत अंदाज न घेता चढून त्रास का करून घ्यावा ?
Keep it simple silly
Girish
जुलै 29, 2011 at 1:32 pm
लहानपणी कवयत्री ‘यशोदा ‘ ह्यांची एक कविता ऐकली होती ..
थोडक्यात सांगतो ..
“मौनाने ही होते एवढे रामायण, हे कळले असते ..
तर शब्दांचा आधीन गेले असते ..
पण शब्द म्हणजे अंध कौरव ..
पोटात एक आणि ओठआत भलतेच ..
मौनच रामायण सहन करता येत, सीता होऊन ..
पण शब्दांचे महाभारत सोसायला ,पाठीशी कृष्णा हवा .. ”
गिरीश ठाकरे
Gayatri
जुलै 29, 2011 at 2:44 pm
केतकी
जुलै 30, 2011 at 12:53 सकाळी
सुंदर लिहिलं आहेस!
आणि गिऱ्या, कविता फारच मस्त आहे…
Gayatri
जुलै 30, 2011 at 8:48 सकाळी
thank you K2
Minakshi Jaybhay
जुलै 30, 2011 at 1:02 सकाळी
aga Gayatri mala ajun hi tuz te roop athavata kay bolali hotis tu…..Pan kahi velela “Zashi” vyavach lagata…..Sahi lihlas….Keep it up….
Gayatri
जुलै 30, 2011 at 8:50 सकाळी
thnx Minu
tumhi sagalya tya prasangachya saakshidaar aahat..hmm, Jhaashee vhavach lagta yogy asel tithe
pankajborole
जुलै 30, 2011 at 9:57 सकाळी
Nice chan lihile ahe Gayatri !! Aapali kahi chuki nastana aas kahi zale tar pratikriya hi dilich pahije.. The first paragraph took me back to my school days .. the story of Lokmanya Tilak in second standard …
Gayatri
जुलै 30, 2011 at 12:20 pm
thnx Pankaj
vaibhavi bhide
सप्टेंबर 27, 2011 at 2:36 pm
गायत्री,
खूप छान लिहिलं आहेस.
मला प्लीज तुझा ईमेल आयडी कळवू शकशील का..
-वैभवी भिडे
मेनका प्रकाशन, पुणे
vaibhavi.bhide@gmail.com
Gayatri
सप्टेंबर 30, 2011 at 11:10 pm
Thanks Vaibhavi
It was a real pleasant surprise talking to you!