आळस, कंटाळा ह्यांचा पसारा खूप वाढलाय आजकाल, जो भेटतो तो वैतागलेला, कंटाळलेला; थोड्या फार प्रमाणात कमी-जास्त. पण negative energy चं प्रमाण वाढलंय वातावरणात. ५-६ वर्षापूर्वीचे आपण अन आजचे आपण, विश्वास बसत नाही, एवढं काही चोरून नेतं (अन तेही तुमच्या नकळत) एक routine आयुष्य तुमच्याकडून? जगाचे अन जगण्याचे वेग-वेगळे काने-कोपरे कळले की प्रवाहातले एक बनून जायला वेळ लागत नाही..ordinary life . स्पर्धा अन तिथे टिकून राहण्याची धाव-पळ प्रत्येकालाच वेळे-आधी म्हातारं बनवते आहे, ते ही पुन्हा नकळत! शाळा, कॉलेज, नोकरी, घर, लग्न, संसार ह्या मार्गाने जाणं जसं compulsory च आहे अन गेलात तरी तिथून करावयाचा प्रवासही एका ठराविक मार्गाने अन ठराविक साच्यातच करणं must आहे ही विचारसरणी नकळत खोल रुजलेली असते..खूप कमी लोकांना साच्याबाहेर विचार करायला जमतं अन त्यातूनही खूप कमी जणांना साच्याबाहेर जगायला जमतं…
म्हणजे साचेबद्ध जीवन जगणं सटर-फटर आहे असं म्हणायचं नाहीये मला..जे काही जगताय ते आतून अन समाधानाने जगलं गेलं पाहिजे अन तेच आज दुर्मिळ होत चाललं आहे, शांती हरवते आहे. दोन घडीचा वेळ afford करू शकत नाही आज-काल कुणी कारणमीमांसा करायला..बस वाहत राहायचं..मग फोफावत जातात तऱ्हे-तऱ्हेची शिबिरं, counselling अन महागडी outings..म्हणजे हे सगळं मनापासून होत असेल तर प्रश्न नाही पण काही जण शांती-समाधान वगैरे मिळवण्यासाठी जातात अश्या ठिकाणी. असं ठरवून नाही ना मिळत ह्या गोष्टी, त्या रोजच्या आयुष्याचा एक भाग असायला अन व्हाव्या लागतात.
शेवटी कसं जगावं ही सुद्धा एक वृत्ती असते , रडत-पडत की हसत-खिदळत. पळत्याच्या पाठी धावत राहिलं तर रस्ता कधीच संपणार नाही, अन रस्त्याला फाटे तर फुटत राहणारच..बरं पळायचंच आहे तर पळा पण किती, का अन कसं एवढं ठरवून पळा. म्हणजे हे सगळं जमणं तसं सोपं नाहीये पण खूप कठीणही नाहीये , जमवायचं म्हटलं तर जमतं सगळं. पूर्वीचे लोक होतेच ना सुखी-समाधानी आज एवढ्या सोयी-सुविधा नसताना, कारण प्रत्येक गोष्ट मिळवण्यासाठीचा प्रवासच त्यांना घडवायचा..आज-काल प्रवास होतोच कुठे, नुसतीच धाव-पळ जी आयुष्य काय आहे हे कळायच्या आतच सर्व काही घेऊन जाते.
परवा office मधून निघायला आधीच खूप उशीर झालेला, तश्यात tyre puncture, झालं! चीड-चीड सुरु, सगळ्या जगात आपल्यालाच कसा त्रास आणि tensions आहेत इति इति पोकळ विचार. puncture काढणारा मुलगा जेमतेम १५ वर्षाचा असेल, एकदम हसमुख. त्याची परिस्थिती, काम करण्याची जागा काहीच चांगल्या condition मध्ये नव्हतं तरी हा सर्व-सुखी. मन लावून काम करतोय, अजिबात अढी नाही त्रासाची. कुठून शिकला असेल तो हे सगळं? शाळेत जातो का हे विचारल्यावर शांतपणे ‘नाही’ एवढंच म्हणाला. नंतर मलाच वाटून गेलं की मी उगीच कीडा सोडून त्याचं आयुष्य अस्वस्थ केले की काय. पण तो त्याच्या मूळ स्वभावानुसार पुन्हा निर्विकार..
किती, कसं अन का पळायचं आहे ह्याची calculations त्याला अगदी clear होती वाटतं.
त्या दिवसापासून रोज office ला येता-जाताना त्याच्या दुकानवजा टपरीवर लक्ष गेल्याशिवाय राहत नाही, स्वत:ची calculations पडताळून बघता येतात त्यानिमित्ताने..
Pankaj Borole
एप्रिल 21, 2011 at 11:49 सकाळी
Good one .. believe me or not .. This is your best post ever ..
विजय
एप्रिल 22, 2011 at 8:06 pm
फार बरोबर बोललीस तू. आपण एकटेच पळतो असं नाही, तर इतरांना पण पळायला लावतोय. काल होतं त्यापेक्षा मोठं काहीतरी आज हवं असतं – मोठं घर, मोठी गाडी, मोठा बँक balance . पण ह्यात मोठा आनंद, मोठं समाधान असेल असं नाही. उदाहरणच द्यायचं झालं तर परवा बेडरूमच्या sliding door ची काच पुसली स्वच्छ, समाधान वाटला – रोज ते डाग बघून होणारी चिडचिड थांबेल आता… किती वेळ लागला फार-फार तर १५ मिनिटे, किती पैसे लागले – शून्य, पण समाधान किती मिळालं – बरंच – आणि खूप दिवसांनी!
चल, ha काही माझा blog नाहीये
chitra
एप्रिल 26, 2011 at 12:03 pm
Mast .. Khara tar barech vela he sagala kalat asata….pan madhun madhun asa brain storming pan khup important asata… thanks
Sachin Patil
ऑक्टोबर 1, 2011 at 8:31 pm
aasa lihaly ki vichar karayla lavtes
… good one.