प्रसंग १:
सकाळची वेळ, office ची pantry ह्या वेळी सगळ्यात जास्त गजबजते..तश्यात दोन मुली pantry च्या दाराच्या अगदी मधोमध उभ्या..बरं संवाद तरी काय? पहीली दुसरीला तिच्या ड्रेसबद्दल विचारते “ही बांधणी print की गढवाली?”, दुसरीला त्यातलं विशेष काही माहीत नाही..त्यामुळे उगाचच सुरु चर्चा..बाकी लोक ताटकळत, आतले आत अन बाहेरचे बाहेर..कित्येकांना असतील महत्त्वाची कामं आपापल्या जागेवर जाऊन..
प्रसंग २:
वेळ दुपारची, स्थळ पुन्हा office, लोक इतक्यातच जेवण आटोपून पुन्हा आपापल्या जागी परतलीत, सगळीकडे शांतता..अन अचानक जोर-जोरात गप्पा, हसणं-खिदळणं सुरु झालं, work-hall मध्ये ठेवलेल्या सोफ्यावर ४-५ मुलींचा घोळका येऊन बसला..अन विषय तरी काय? “मेहेन्दीमे अंडा डालो तो मस्त होते है बाल” दुसरी: “अर्रे दही डालो, उससे भी मस्त होते है”..अन इति इति ..माझ्या शेजारी बसलेला colleague अन मी हैराण..नेमके आमचे cubicle त्या सोफ्याशेजारी..२ वेळा त्यांच्याकडे कटाक्ष टाकून ही no use ..ज्ञान पाजळा, नाही कोण म्हणतंय, पण जरा आजू-बाजूचे भान ठेवा..
प्रसंग ३:
पुन्हा office, एक meeting सुरु आहे (महत्त्वाची असू देत किवा नसू देत), एकीचा mobile वाजला..वाटलं silent करून ठेवेल पण कसलं काय..madam SMS-SMS खेळत बसल्या…१५-२० मिन्स, काही वाटलं नसतं जर mobile च्या keypad चा आवाज झालं नसता, मोठा अन irritate करणारा आवाज होता..अक्षरश: सगळ्यांचा कटाक्ष टाकून झाला, पण दृष्टी हरवलेल्यांना काय दिसणार..
प्रसंग ४:
आहेत काही नमुने office मध्ये, seniors आहेत म्हणायला..पण जेव्हा कुणी काही निमिताने sweets किंवा chocolates आणतं सगळ्यांसाठी, हे दोघं निवांत भर-भरून खिसे अन drawers भरतात!(LITERALLY)..देणाऱ्याने न राहवून “अजून खूप लोक राहीलेत” म्हणलं तरी घेणं-देणं नाही, पुन्हा संध्याकाळी निघताना काही शिल्लक आहे की नाही हे बघायला येणार अन असेल-नसेल ते सगळं न विचारता उचलून नेणार..! शब्द नाहीत..
प्रसंग ५:
स्थळ: Office cafeteria, उपवासाच्या फराळाचं counter, genuine उपवास करणारे रांगेत उभे असताना उपवास नसलेली ४-५ डोकी(?) रांगेला तडा देत खरकटं ताट घेऊन उपवासाचं काय बरं घेता येईल ह्याचा विचार अन मग नंतर कृती करत शिरली, बरं वाढून घेताना चमचा ताटातल्या आधीच्या जेवणाला लागून आपण तो उष्टा करतोय एवढं कळण्याइतका धीर नाही..
असे बरेच काही अनुभवायला मिळते, मान्य व्यक्तीस्वातंत्र्य वगैरे..पण हक्कांना कुठे अन कसं अन कुठल्या limit पर्यंत वापरावं ह्याची तरी जाणीव ठेवा..सार्वजनिक ठिकाणी वावरताना दुसऱ्याला त्रास होणार नाही एवढी काळजी तर नक्कीच घेता येण्यासारखी आहे, पण एवढा विचार करतंय कोण? ह्या लोकांना तिथल्या तिथे त्यांची चूक जाणवेल अशी कृती करायलाही आपण ४ वेळा नको तितका विचार करतो..पण हे लोक आपल्याच दुनियेत असतात.अतिक्रमण अन अतिरेक अश्या दोन्ही गोष्टी एकाच वेळी..
उथळपणे वागताना खोलात शिरायची गरज असतेच असं नाही पण खोलात शिरण्यासाठी आधी उथळपणा भेदायलाच लागतो ..
pankajborole
एप्रिल 14, 2011 at 11:27 pm
Sahi ahe observations.. exact situation lihilelya aahet tu..
Ashya lokankade aapan fakt Durakshch karu shakto ..ani devala pray karu shakto.. ki deva hyana thodi .. budhi de
Gayatri
एप्रिल 15, 2011 at 11:17 सकाळी
chitra
एप्रिल 15, 2011 at 10:15 सकाळी
Good One…Khup divasani tuza blog vachal. Mast ahe.. as usual
Gayatri
एप्रिल 15, 2011 at 11:17 सकाळी
Thanks Chitra
Ashish Sawant
एप्रिल 15, 2011 at 10:27 सकाळी
प्रसंग ६:
आपल्या टेबल वर ठेवलेली पाण्याची बॉटल आपलीच समजून पिणारे महाभाग असतात. पाणी प्यायला काही नाही पण तोंड लावून स्वत:ची असल्यासारखी का पितात ते माहित नाही.
प्रसंग ७:
Pantry मध्ये जेवायला बसलो असताना आपण एखादी भाजी किंवा चपाती घ्यायला उठलो किंवा जागा सोडली कि परत येईपर्यंत त्या जागेवर दुसराच कोणीतरी बसलेला असतो. अगदी माहिती असून सुद्धा. आजूबाजूचे आपलेच मित्र मैत्रिणी असतील आणि त्यांनी ‘इथे तो बसलाय’ सांगून सुद्धा आपल्याच जागेवर मुद्दाम येऊन बसणारे महाभाग असतात.
प्रसंग ८:
घरून डब्यात आणलेली भाजी न विचारातच आपल्या उष्ट्या चमच्याने काढून घ्यायची आणि वर ‘भाजी मस्तच होती रे पण वहिनींना सांग जरा मीठ कमी घालायला, अरे जास्त मीठ चांगले नसते’ असा कमेंट पण मारायचा.
असे अजून हि अनेक प्रसंग असतात जे खरच डोके फिरवतात. बाकी तुमचा लेख मस्त जमलाय. मोजक्या भाषेत खूप सांगून जातो.
Gayatri
एप्रिल 15, 2011 at 11:16 सकाळी
Thanks Ashish..
ह्या प्रत्येक प्रसंगाबरोबर कदाचित आपली tolerance level वाढत जाते हाच काय तो चांगला भाग
मिलिंदा
एप्रिल 15, 2011 at 10:34 सकाळी
उथळपणे वागताना खोलात शिरायची गरज असतेच असं नाही पण खोलात शिरण्यासाठी आधी उथळपणा भेदायलाच लागतो ..
अगदी खर……!
Perfect Gayatri. Keep writing……….!
Gayatri
एप्रिल 15, 2011 at 11:15 सकाळी
Thanks Milind