“कामवाली बाई” नेहमी जिव्हारी लागणारा जिव्हाळ्याचा विषय असतो.
पहीला प्रश्न: मिळेल का कुठे?
नंतर: कशी असेल अन package किती द्यावे लागेल?
उत्तर काहीही असले तरी गत्यंतर नसणारे प्रश्न: दांड्या किती मारेल? वेळेवर येईल का? काम नीट करेल का?
अश्या सगळ्या steps पार केल्यावर सुरु होतो रोजचा खेळ..
जुळवून घ्यावं लागतं, म्हणजे सासू/सूनेचं नातं असल्याप्रमाणे..
कुठे अन कशी ठिणगी पडून भडका उडेल सांगता येत नाही..
नवीन घरात shift झाले अन शोधली एक बाई..पहील्या भेटीतच click झालं: प्रकरण जरा सरळ नाही..नखरे झेलण्याची सवय करून घ्यावी लागेल, अन जरा दमानेही घयवे लागेल..
खेळ सुरु..
बाई येणार अन जाणार..
मनाला येईल तसंच काम करणार: valid सूचनांना entertain केले जाणार नाही..
दांडी? वाटेल तेव्हा..
रोजची वेळ? Flexi-time तिच्या वेळेप्रमाणे जुळवून घ्या..
कामही एकदम चाल-ढकल..
तरी म्हटलं, जाऊ देत..सुरुवातीचे काही दिवस जरा adjust होण्यात जाऊ द्यावेत..समोरची व्यक्ती समजून घेते म्हटल्यावर जरा बदल होईल..
पण नाही, जाणीवेचा गाव माहीत नाही तिला..
join करून २ महीनेही नाही झाले अन बाईनी आज सकाळी फर्मान सोडले: “पगार वाढवून द्या १०० रु. नी, परवडत नाही”
अवाक मी: “आधीच व्यवस्थित आहे पगार, लगेच नाही वाढवता येणार..”
ती: “ते काही नाही, सगळीकडे जास्त आहे”
मी: “घरात आम्ही फक्त ३ माणसं, भांडी/काम पण खूप कमी असतं, बरोबर आहे सध्याचा पगार”
आवाज चढलेली ती: “नाही नाही, ५० तरी वाढवाच”
(आता मात्र चीडूनही शांत असलेली) मी: “नाही, इतक्यात तरी जमणार नाही”
बाईंचा आवाज बंद, म्हणजे समजून घेणे की महीना संपल्यावर बाई येणार नाहीत..
नको येऊ देत, पैसे थोडे-फार वाढवलेही असते पण बाईंचं काम तेवढं worth ही नाहीये..
हवे तेव्हा पैसे वाढवून देऊन चुकीचे संकेत द्यायचे नाहीयेत मला..
ती गेली काम आवरून, पण माझ्या डोक्यातून निघायला तयार नाही..
काय पण मजेशीर गोष्ट आहे:
काल संध्याकाळी भांडी लावताना नुसती नावाला घासलेली/धुतलेली भांडी बघून मी ठरवलं होतं, उद्या बाईना जरा समजवून सांगावं लागेल..
सकाळी ती आल्यावर बोलणार होते तितक्यात वाटलं “जाऊ देत, कशाला तिची सकाळ (अन त्या-योगे पूर्ण दिवस) खराब करायचा? बोलूया नंतर, तिलाही चार घरची कामं अन स्वत:च्या घरचे ताप असतील”
अन ती अशी बेदीक्कत माझी सकाळ, दुपार, संध्याकाळ खराब करून गेली
मी पण कुणाकडून अपेक्षा ठेवतीये..
त्यापेक्षा तयारीला लागायला हवं..
थोड्याच दिवसात आता “नवा गडी, नवे राज्य..”
आलीया भोगासी..असावे सादर!
Avani Vaidya
मार्च 30, 2011 at 3:41 pm
1 no..
mi pan sadhya ashach anubhawatun jatey..
so jam patala lekh..
Jagruti
एप्रिल 7, 2011 at 1:10 pm
a good blog after a long time. perfect placement of software fundas package, flexi time etc in blog. keep writing.