RSS

जाणीव…

22 Mar

एखादं काम (लहान असू देत किवा मोठं), धाकामुळे केलं जातं किवा जाणीवेतून
जाणीवेतून केलं तर दोघांना समाधान – ज्याच्यासाठी केलं त्याला अन ज्याने केलं त्यालाही..
जाणीव त्या कामाचं ओझं कमी करते तर धाक त्याला नको तितकं असह्य करतो..
जाणीव त्या कामाने ज्याला हात-भार लावला त्याच्याबद्दलचा आदर दर्शवते (अन तसंच करणा-याबद्दलही आदर निर्माण करते) तर धाक उपकाराच्या भावनेला खत-पाणी घालतो..
जाणीव आपलेपणा वाढवते, धाक एकटेपणा..
जाणीव मनापासून असते;जास्त काळ टिकणारी , तर धाक वर-वरचा; रात गई, बात गई..
जाणीव निरीक्षण शिकवते, धाक गणन..
जाणीव नेते सकारात्मकतेकडे, भीती गिरवते नकारात्मकतेचे धडे..
आज-काल कमी होतं मात्र असं…
जाणीव स्वत:ची, घराची, देशाची, जगाची, निसर्गाची..किंवा अजून कशाचीही..
मी का करू? मी एवढंच करणं अपेक्षित आहे..
आयुष्याचा पाया निर्माण करणा-या बालपणापासून हे भूत मानगूटीवर बसतं – उदा. अभ्यास: जाणीवेपेक्षा धाकातूनच जास्त केला जातो..अन मग होत जाते सवय सगळं काही उथळपणे करण्याची..मूळांना अशी दल-दलीची सवय झाल्यानंतर पोरांकडून धाक दाखवून पंख लाऊन उडण्याची अपेक्षा करणा-या पालकांना दोष तरी द्यायचा कसा.. कुणाच्याही गावी ‘जाणीव’ नाही, काय चाललंय अन का चाललंय..निरीक्षण नाहीच..नुसती गणती करायची, गणती घड्याळ्याच्या ठोक्यांची, आल्या-गेल्या दिवसाची, स्पर्धा-परीक्षांची, मार्क्सची-स्कोरची, पहिल्या/दुस-या/तिस-या क्रमांकाची…
शांत बसून विचार करायला वेळ आहे कुणाला..कुणीतरी पुढे जाईल हा ‘धाक’ स्वस्थ बसू देत नाही..एवढं उथळ होऊन जातं सगळं की ‘धाका’ चीही ‘जाणीव’ उरत नाही..मग होत जातं सगळं स्वैर..
अन बरंच काही..
फार सोपं अन फार कठीणही आहे, जाणीव असणं अन ती पेलणं..ती एक साधना आहे अन साध्यही..ज्याला जमली त्यालाच जमली

 
5 Comments

Posted by on मार्च 22, 2011 in Life, Misc

 

5 Responses to जाणीव…

  1. सुहास

    मार्च 22, 2011 at 11:17 सकाळी

    जाणीव ही एक साधना आहे अन साध्यही..ज्याला जमली त्यालाच जमली… अनुमोदन :)

    खुप दिवसांनी पोस्ट आली इथे .. लिहिते रहा :) :)

     
  2. Ketaki

    मार्च 22, 2011 at 11:23 सकाळी

    Apratim! :)

     
  3. Pankaj

    मार्च 22, 2011 at 11:40 सकाळी

    Khup. chan watale wachun .. thoda aantarmanat gelo hoto ..
    Janiv kharacha JAAN aante jivana madhe ..
    Keep writing dear sis!

     
  4. vijay

    मार्च 22, 2011 at 2:59 pm

    हं… जाणीव – असायचं असं काहीतरी… कुठे गेली कुणास ठाऊक!
    दुसरा एक पैलू मांडू? स्व-अनुभवावरून सांगतो… जाणीवेतून खूप काही होतं, करता येत.. कष्ट वाटत नाही.. प्रोब्लेम कधी होतो.. जेंव्हा जे हवं होतं ते मिळाल असं वाटलं की. मग तुप्ततेची जाणीवच काही करू देत नाही. कशाला उपदद्व्याप? मग “धाक”, “ध्येय्य” किंवा “धक्का” मिळे पर्यंत फक्त दगड होवून जगत राहतो..

     
  5. Girish Vilasrao Thakare

    एप्रिल 19, 2011 at 5:57 pm

    तू ब़रोबर बोललीस, जाणीव पेलणं ही एक साधना आहे, ज्याला जमली त्याला जमली.
    ह्याचा एक दूसरा पहलू पन आहे. ग़रीबी आणि जबाबदारी मुळे आपली बालपण हरवलेली काही मुले मी बघितली आहे.
    मुले काय पण मोठी माणसे तरी कुठे सक्षम असतात जाणीव पूर्वक जबाबदारी निभवायला?

    ही जाणीव कधी कधी माणसाचा अस्तित्वाला पण चॅलेंज करते ..

     

तुमचा अभिप्राय नोंदवा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदल )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदल )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदल )

Connecting to %s

 
Follow

Get every new post delivered to your Inbox.