RSS

पुनर्जन्म…

18 Nov

ह्म्म्म…एक काळ लोटलाय इथे लिहून…म्हणजे गेल्या काही दिवसात इतरांनी विचारण्यापेक्षा मीच स्वत:ला कितीदातरी हा प्रश्न विचारला आहे…”आजकाल(?) काही लिहीत नाहीस?” का वगैरेचा विचार करायला गेलं तर समाधानकारक असं उत्तर अजूनही मिळालं नाहीये, मध्येच एकदा वाटलं की writers’ block म्हणतात तसला काही प्रकार असेल, पण ‘writer’ वगैरे म्हणवून घेणं म्हणजे जरा अतिच झालं…बरं, उगाच प्रयत्न करून, ओढून-ताणून लिहीण्यात ही काही राम नाही..(आताही तसंच काहीसं होतंय की काय अशी शंका येतेच आहे)

अवघड आहे खरं, आतून शांत वाटत नाही तोवर मनापासून मनातलं काही उतरत नाही…आणि मग कळतंय ‘आतल्या’ शांतीबद्दल विचार करायला तरी कुठे वेळ मिळतोय सध्या…घड्याळाच्या काट्यावर सगळा हिशोब सुरु आहे…जमा तशी काहीच नाही, सगळा खर्चच खर्च…झोपताना कितीला उठायचा हा हिशेब, उठल्यावर सकाळच्या ‘tasks’ चा हिशेब: डबा, आवरा, ट्रेन पकडा, office गाठा अन office गाथा इति, office मधला हिशेब न केलेलाच बरा, निघताना पुन्हा पुढचा ताळेबंद..गाडी, बनवायचं काय रात्रीच्या जेवणात अन असतंच पुन्हा कामाचं लहान-मोठं शेपूट, लहान असलं तर मानायचा त्यातला त्यात आनंद…काय पण आनंदाचे निकष झालेत! हसावं की रडावं कळत नाही..हा हिशोब काही जमत नाही…’एक दिवस’ ह्या एककात सध्या सगळे calculations, हीच झाली चौकट.., scope थोडा वाढतो महिना-अखेरीस किवा सुरुवातीला, जेव्हा monthly बिलं विचारशक्तीला जरा वेगळा वाव देतात..अन त्याहून पुढं जायचं म्हटलंच तर मग आहेत घराचे EMIs, ५ वर्षांनी स्वत:ला कुठे बघतेस ह्या प्रश्नाचं ५ वर्षापूर्वीच अन आजचं उत्तर ‘उत्तर-दक्षिण’ ध्रुव…आता कुणी विचारलं तर पहिलं डोक्यात येतं ‘home loan nil करायचं!!!!’ काय पण महत्त्वाकांक्षा :( … एवढं बदलतं चित्र?

५ वर्षापूर्वी जग बदलू शकण्याची उमेद, आज स्वत:चा mood बदलण्याचीही मारा-मार..

Priorities एवढ्या बदलतात? Rather आपण एवढे वहावत जातो त्यांच्यासोबत? ह्या प्रश्नाला उत्तर नाही सहज, प्रतिप्रश्न मात्र हजार आहेत…त्यात शिरायला नकोच…एक एक प्रतिप्रश्न म्हणजे excuse , स्वत:ला नको ते समजावण्याचा..आहे खरं depressing, त्याला justification नाही..पण असल्या (-.-) ग्राफ मध्ये (+,+) पण खूप आहेत…विचार केला नव्हता अश्या ब-याच गोष्टी अनुभवायला मिळाल्या…चांगली ‘लोकं’ भेटलीत आजवरच्या धावपळीत ज्यांनी वर मांडलेला हिशोब सुसह्य बनवला…’भौतिक’ म्हणा हे सारं पण it counts..’जगण्याची जाणीव’ जीवंत आहे तोवर ताप नाही..असं म्हणून over-optimistic होत नाही…पण at least असं म्हणून नको त्या निराशावादासून लांब तरी राहता येतं..

तेवढीच महत्त्वाकांक्षांची उजळणी..अन त्यायोगे पुन्हा एक पुनर्जन्म…स्वत:चा :)

 
5 Comments

Posted by on नोव्हेंबर 18, 2010 in Life, Misc

 

5 Responses to पुनर्जन्म…

  1. विजय

    नोव्हेंबर 18, 2010 at 11:47 सकाळी

    खूप दिवसाचं साठलेलं आहे असा दिसतंय. मी समजू शकतो. पण व्यक्त करणं अवघड असतं, तू प्रयत्न तरी केला आहेस. पण स्वप्नांचा हिशेब ठेवू नये असं माझं मत. – आजचा दिवस काल पेक्षा बरा जावा असा क्षुद्र विचार करणारा माणूस आणखी काय सांगणार :)

     
    • Gayatri

      नोव्हेंबर 19, 2010 at 9:09 pm

      Kshudra vagaire kaahi naahi, hi sagalyanchich paristhiti aahe thodya phaar pharakane…

       
  2. Girish

    नोव्हेंबर 19, 2010 at 12:27 pm

    He paristhiti tarun pidhitalya baryach tarunanchi aahe .. swatala aajacha dhavpalitan bajula karan avaghad aahe .. Gayatri tu pan kahi exception nahi :)

    ek tula shayari sangato .. mi lahan pani aikali hoti ..
    mahit nahi kutthe milel ka ti net varati aata ..

    ek tarun mulaga asato .. far mahattvaakankshi asato ..
    jivan jaganyasathi sangharsha karat asato ..
    phar prayatna karun sudha tyala yash milat nahi .. nirash hoto ..
    “alla” la uddheshun mhanto .. prarthana karato ..

    ” Suraj hai to .. hone de namudar .. muzhe bhi ..
    Karana hai .. teri duniya ko .. bedar muzhe bhi ..

    wo mera hausala aise badhaya karata hai …
    ki muzh ko .. meri najaromein .. giraya karata hai ..

    apane hisse ka has loo .. meri ye kaha hai kismat …
    apane hisse ka ro liya .. wohi bahoot hai ..

    duniya se to lad lunga main … bas khudase ladana ..
    sikha di jiye …

    kis-se pucche .. kaun bataye … har koi .. safar mein hai ..
    har kisi ka .. safar .. adhura sa hai .. “

     
    • Gayatri

      नोव्हेंबर 19, 2010 at 9:10 pm

      :) ekdam Girya style reply..
      but sahi shayari share keliyes…
      last 2 lines sagala sangun jatat…
      “duniya se to lad lunga main … bas khudase ladana ..
      sikha di jiye …

      kis-se pucche .. kaun bataye … har koi .. safar mein hai ..
      har kisi ka .. safar .. adhura sa hai .. “

       
  3. Jagruti

    नोव्हेंबर 26, 2010 at 12:44 pm

    G3 nice one. changla watla itkya divsan nantar direct punarjanm.
    Girya tujhi blog aahet ka. tu reply madhe akha blog lihilayas.

     

तुमचा अभिप्राय नोंदवा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदल )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदल )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदल )

Connecting to %s

 
Follow

Get every new post delivered to your Inbox.