एक मनाने स्वच्छ व्यक्ती अन दुसरी जरा तिरसट, एकाच वेळी दोघांसोबत interaction करायचा योगायोग… तिरसटाच्या वाट्याला जाण्याची तुमची नेहमीप्रमाणे अजिबात इच्छा नाही…पण तिरसटाला स्वभावत: वाकड्यात जाण्याची खुम-खुमी…(म्हणजे मी नेहमी असं ऐकलंय की कुणाच्या वाटेत खुड-बुड केल्याशिवाय तो ‘कुणी’ तुमच्या वाटेला उगी येत नाही, पण अनुभव काहीतरी वेगळंच दाखवतात..काळ बदलला की लोक?…की ती एक मानसिकता आहे जी बदलत नाही? …असो…)
तर तिरसट (ति.) गेलाच वाकड्यात…तुम्ही दुर्लक्ष करता…तरीही ति. त्याच track वर…म्हणजे तळपायाची आग मस्तकाला जाईल असं काहीतरी….पण मग सोबत असलेल्या स्वच्छ व्यक्तीने हे ओळखावं अन त्याच्या एका छोट्या कृतीतून परिस्थिती सांभाळावी…अजूनही तुमची आग मस्तकात, पण फक्त त्या स्वच्छ व्याक्तीखातर तुम्ही ति. च्या नादी नाही लागत…आदराचा भाग होता स्वच्छच्या प्रति, बाकी काही नाही…
दिवसात तुमच्यासोबत घडणा-या १००० गोष्टींपैकी ही १…दिवस संपता संपता ह्या गोष्टीवरचे विचार पुन्हा सुरु होतात…मी जे केले ते योग्य होते का? ति. ला आपण उगाच बढावा दिला का? आपण उत्तर द्यायला हवं होतं का त्याच तोडीचं? आपण स्वत:चा ‘मान’ ठेवला नाही का?
पण मग हळू-हळू उत्तरं मिळत जातात…ति. च्या level ला जाऊन स्वच्छचा अनादर करण्याचं पाप किवा सल जास्त बोचरी ठरली असती…अन त्याहूनही बोचरं ठरलं असतं: तुम्ही तुमच्यातली एक चांगली मानसिकता ति. साठी बळी दिली… ति. असाच तर शिरतो….हळू-हळू…पसरत जातो तुमच्यात, तुमच्याही नकळत…शिरकाव करूच द्यायचाच आहे तर मग स्वच्छाने केलेल्या त्या छोट्या कृतीमधल्या हेतूचा का नको…दुस-याने निखळ आनंद मिळेल तर पहील्याने फक्त चीड-चीड अन द्वेष…घेऊन जाणार कुठे?
चांगल्या-वाईटाचा हिशोब शेवटी ‘त्या’ ला द्यायचा असतो/नसतो..माहीत नाही…
पण जाताना स्वत:ला स्वत:चा हिशोब करायचा/द्यायचा झाला तर ति. च्या गावी जायचेच कशाला?
‘जाताना’ पश्चाताप करण्याचे क्षण जेवढे कमी तेवढी शांती जास्त
Because…Life has NO ‘U’ turn/s….at anytime…
GP
जून 18, 2010 at 9:10 सकाळी
Last line was most meaningful.
Pankaj
जून 18, 2010 at 9:48 सकाळी
Thanks for the Quality post Gayatri !
V good lines..
‘जाताना’ पश्चाताप करण्याचे क्षण जेवढे कमी तेवढी शांती जास्त
Because…Life has NO ‘U’ turn/s….at anytime…
My personal experience with “Tirsat” =>
Behave very good with them .. he/she will change..
sometimes people do behave like this .. becoz of some personal offline reasons in their life ..
Best is FORGIVE them and go ahead
Gayatri
जून 20, 2010 at 11:31 सकाळी
Thanks Pankaj..
yes, you are always one of those ‘swachchha’ manasa…
विजय
जून 18, 2010 at 1:26 pm
बरंच झालं, ‘ति’ च्या नादी नाही लागलीस ते. एक इंग्रजीत एक वाक्य आहे, मी नेहमी लक्ष्यात ठेवतो:
Never argue with a fool, he will get you to his level and beat you up with sheer experience.
‘ति’ च्या बाबतीतही तसाच काहीसं…
हं, आता मलाच लोक ‘ति’ च्या रांगेत बसवतात हि वेगळी गोष्ट.
Gayatri
जून 20, 2010 at 11:33 सकाळी
‘ti’ vagaire nahiyes tu
ngadre
जून 20, 2010 at 7:52 सकाळी
well said. Perfect..
Tirsat agadi satat nashibaat asataatach. So your thoughts are helpful..
Post mastach.
Gayatri
जून 20, 2010 at 11:33 सकाळी
Thanks Nachiket
tumche boosting words mhanje mothi gosht…
Sudeep
जून 21, 2010 at 9:43 pm
From my past experience I want to tell that tirsat la tithlya tithe uttar dena changla. Nahitar ti la tyachya ti cha abhimaan vatato ani hi vrutti sokavate. Pratyuttar dene mhanje swatah ti hone nave.
Maitrin
जुलै 22, 2010 at 3:59 सकाळी
Kharach ga…khara sangitale….
aaj khup divasanni tuzhi postings vachnyacha vel milala … khup bare vatale…agadi chhan ani satya lihates…asa kahitari je khup lonkachya manat asate pan madu shakat nahit … te mhantat na kalate pan umajatach nahi tya type….pan ho I agree ki aaplyakade U turn ghyayachi permission nahiye ani tyamule sarva kshan aanadane ch jagayala have.
Ketaki
नोव्हेंबर 10, 2010 at 2:06 pm
G3, khup chan lihites tu! Agadi khara ahe, Life has no U turns..
BinaryBandya™
नोव्हेंबर 10, 2010 at 2:28 pm
छान झाली आहे पोस्ट …
स्वतः:मधल्या चांगुलपणाचा उगाच कोण तिरसटासाठी बळी देऊ नये …
“ती”च्या सारखेच वागायचे ठरवले तर दोघामध्ये काहीच फरक उरणार नाही