बातम्या ऐका किंवा newspaper वाचा, आज-काल frustrating बातम्यांचे प्रमाण एवढे वाढले आहे की त्यातून येणारा सुन्नपणा सवयीचा व्हायला लागलाय. असं व्हायला नकोय खरं तर. एखादी गोष्ट सवयीची झाली की मग तिला काही अर्थच उरत नाही. पण अश्या घटनांचा वेग मनाला सुन्नपणातून बाहेर यायला वेळच नाही देत. मग रोज मरे त्याला कोण रडे…
अवघड झालंय सगळंच. खून काय, लुटा-लूट काय, बलात्कार काय…धरबंध नाही उरला…एक ‘जीवंत’ माणूस समोरच्या माणसाच्या ‘अस्तित्वाचा’, भावनांचा अजिबात विचार न करता त्याचं आयुष्य इतक्या सहज बदलू शकतो? अधिकार दिला कुणी? क्षणभरचं स्वार्थी सुख(?) असं दुस-याच्या राखरांगोळीने रंगवता येतं? एकदा मिळणारा मनुष्य जन्म (मग तो स्वत:चा असू दे वा समोरच्याचा) असा धुळीला मिळवताना काहीच वाटत नसेल का अश्या दगडांना? कीड्या-मुंगीसारखी माणसं जन्माला येतात अन जातात…अश्या अचेतन जीवांना ‘माणूस’ म्हणून ह्या जमिनीवर पाठवताना ‘त्याच्या’ मनात तरी काय सुरु असतं? असं करून ‘त्यानेच’ ‘त्याचे’ व्याप नाहीये का वाढवून घेतले? जगाच्या एका कोप-यात घडणा-या अश्या घटना ऐकून आपल्याला एवढा विषण्ण व्हायला होतं तर मग अक्ख्या संसाराचं हे असलं विष ‘तो’ कसं काय पचवतो, कुठं काढत असेल ‘तो’ हे frustration? Overhead वाढवून घेतलाय ‘त्याने’ ह्या सगळ्यात..पाप-पुण्याचे हिशोब ठेवणा-यापैकी पापं नोंदणारी team overtime करून करून थकत असेल..
कुठवर चालणार हे सगळं? निर्भयपणे वावरायची सोय नाही. धाक-धुक…असं घाबरत जगण्याला ‘जगणं’ तरी कसं म्हणावं? आताच हे हाल, पुढच्या पिढीचं काय? ‘जग खूप सुंदर आहे’ असं म्हणत त्यांना घडवायचं की ‘पाउल पाउल जपून टाक’ म्हणून बिचकत जगायला शिकवायचं? स्वत:च अश्या दोलायमान स्थितीत राहत पालकत्व तरी कसं पेलायचं? नुसतेच प्रश्न…
बरं, माणसाची पापं नुसती माणसांप्रतीच directed नाहीत…निसर्गाचं सुद्धा तेवढंच खेळणं करून बसलाय माणूस…निसर्गाच्या विरुद्ध जाणं घातकच..कुठल्या न कुठल्या रुपानं त्याची साक्ष द्यायला सुरुवातही केलीये निसर्गानं…सगळं बघून असंही वाटून जातं, ‘होऊन जाऊ दे प्रलय एकदाचा’…नव्याने सगळं सुरु करायची तेवढीच एक संधी…पण पुन्हा वाटतं, असाच काहीसा विचार करून एक नवीन संधी मिळाली असेल माणसाला अन त्या संधीचं रुपांतर माणसाने आज जे काही दिसतंय त्यात केलं असेल…quite possible.
बहीणाबाईनी म्हणलेलं ‘मानसा मानसा, कधी होशील मानूस’ स्थल-कालपरत्वे जसंच्या तसं applicable आहे…
माणसा माणसा…
21
Apr
tejalborkar
एप्रिल 21, 2010 at 1:39 pm
khare aahe. Sagalech halli bhavanashunya zaale aahet. Agadi aapan vachanaare suddha, batami vachun 2 min halhal vyakta keli aani mag sampala to vishay. Aapan kiwwa mi swata yasathi kahi karate ka ? nahi. Aani kharech durdaivane kadhi ashi garaj padali tari, mi ekhadyala vachavnyasathi kahi karel ka ? mahit nahi, aani he dukh mala jaast aahe, ki maze uttar “HO” nahiye.
ngadre
एप्रिल 21, 2010 at 7:45 pm
chhaan article.
Small point..halli ch kahi faar jhalay ase nahi..
Poorvipasoon asha ghatana ghadatach ahet..
Loksankhya vadhali mhanoon ‘ghatanancha’ count vadhala itakach..