परवा राहुल द्रविडने retirement घेतली..आठवड्याभरापूर्वी बरीच जनता त्याने retirement घ्यावी म्हणून चर्चा करत होती. तीच जनता त्याच्या retirement ची news ऐकून खूप senti झाली. म्हणजे पार भूतकाळात जाऊन त्याच्या true gentleman असण्यावर आणि त्याच्या memorable innings आठवून त्यावर चर्चा, facebook वर status updates इति इति..थोडक्यात त्याने जे काही चांगलं केलं होतं त्याचं हे फळ..त्याच्या गुणांची पावती तो जाताना त्याला मिळाली. कारण आता तो नसणारे त्यामुळे त्याचं ‘असलेलं’ पण ‘विसरल्या गेललं’ महत्त्व त्याने bye म्हटल्यावर आठवणं आलंच..
आपल्या स्वत:च्या आयुष्यात डोकावून बघतानाही असे कितीतरी क्षण डोळ्यासमोर येतात.. शाळा, college सोडताना लागलेली अनामिक हुरहूर. लाख तक्रारी असल्या, group मध्ये कितीही रडलो company/job च्या नावाने, तरी सोडताना भयंकर emotional व्हायला होतंच! हजार आठवणी असतात. सगळं काही रोजचं असतं..आणि आता ते पुन्हा जगायला मिळणार नसतं. आठवणी तर सोबत असणारच, पण एक अख्खं जग मागे सुटणार असतं..
‘सोडून जाण्याचा’ हा क्षण कितीतरी गोष्टींना उजाळा देतो, वेगळीच घालमेल करून जातो जीवाची – व्यक्तही करता येत नाही अन लपवताही येत नाही.
कितीही त्रास झालेला असला तरी चांगल्याच गोष्टी जास्त प्रकर्षाने जाणवतात, पुन्हा-पुन्हा आठवतात.
शेवटचा श्वास घेतल्यावरही तसंच काहीसं. चांगल्या आठवणी मागे ठेऊन जाण्यासारखी समाधानाची दुसरी गोष्ट नाही. येणं-जाणं हे प्रत्येकाच्या नशीबी अटळ आहे, पण त्या दोघातला मार्ग स्वत:साठी तसंच इतरांसाठी सुकर होईल हे ज्याच्या-त्याच्या हाती असतं. Choice असतो available . म्हणून होता होईस्तोवर विचार-वर्तन-वाणी चांगली ठेवावी. कुणी आठवण काढली तर त्याच्या चेह-यावर आनंद/समाधान झळकावा, आपल्या नुसत्या आठवणीने त्यांच्या कपाळावर उठणा-या अढ्यांच्या गुंत्यामध्ये गुंतलं की मुक्ती मिळणे नाहीच.